मार्कंडा कंसोबा येथे जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या इमारतीत विद्युत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी : 
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंसोबा येथील जिल्हा परिषदेच्या पड़क्या व बंद अवस्थेत असलेल्या खोलीत खिडकीतून प्रवेश करून विद्युत ट्रॅश छेडछाड़ करने एका विद्यार्थ्यास महागात पडले आहे.   विद्युत शॉक लागून महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल आष्टी येथे ८ व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. 
सूरज सीताराम वेलादी असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.  सदर घटना आज २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या  सुमारास घडली . सूरज  हा  आपल्या आजिकडे राहून शिक्षण घेत होता.  आज शनिवारी  सकाळची शाळा असल्याने इतर शाळेचे व गावातील मोठी मुले शाळेच्या पटांगणात खेळत असतात  अनावधनाने काही मुले बंद असलेल्या पडक्या  खोलीमध्ये मधे खिड़कीतून शिरले. यावेळी त्यांनी विद्युत तारेही छेड़ छाड़ केली.  हा प्रकार सुरु असताना सूरजला विद्युत शॉक लागला  असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली.  सदर मुलाला आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . पण त्याला मृत घोषित करण्यात आले. 
विशेष म्हणजे आज जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत  पड़क्या ईमारतीची  दुरुस्ती करण्याबाबत ठराव घेण्यात आला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बासरसागडे व शाळा व्यवस्थापण समितीचे अधक्ष नंदू  सिडाम यानी दिली.  यावेळी गावातील प्रतिष्टित नागरिक ड़ॉ प्रभाकर पंडिलवार ,उपसरपंच कोवे,बहिरेवार आदि गावकरी उपस्थित होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-29


Related Photos