विश्रामपूर नजीक भिषण अपघात : महिला जागीच ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या विश्रामपूर नजीक आंबेशिवणी रोड वर आज १२ मे ला सकाळी ११ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला त्यात महिला जागीच ठार झाली तर दोघे जण जखमी झाले आहे.
धानोरा मार्गावरील विश्रामपूर नजीक आंबेशिवणी रोड वरून दुचाकीचालकासह एक महिला व लहान मुलगा जात असतांना सामोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकी ला जबर धडक दिली त्यात महिलेच्या अंगावरून ट्रक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर लहान मुलगा व दुचाकी चालक जखमी झाला आहे. अपघात इतका भिषण होता महिलेच्या अंगावरून ट्रक गेल्याने महिलेचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. अपघाताची माहिती होताच घटस्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान ट्रक चालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. वृत्त लिखाण करण्यापर्यंत मृत महिलेचे व जखमींचे नाव कळू शकले नाही. अधिक तपास गडचिरोली पोलिस करीत आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-12


Related Photos