महत्वाच्या बातम्या

 रांगीत आजपासून प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत रांगी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा क्रीडांगणावर गडचिरोली प्रकल्पतरीय क्रीडा संमेलन रविवार 9 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे.

तीन दिवसीय क्रीडा संमेलनात प्रकल्पातील सुमारे अकराशे खेळाडू सहभागी होणार असून क्रीडा कौशल्याचे उत्तम प्रदर्शन करणार आहेत. 

क्रीडा संमेलनाचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते 9 ऑक्टोबरला सकाळी 9.30 वाजता होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे राहणार आहेत.

यावेळी विशेष अतिथी म्हणून आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मिना, जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद,सहाय्यक  जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ.मैनक घोष, सिने अभिनेता चिरंजीव गड्डमवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून रांगीच्या सरपंच फालेश्वरी गेडाम, सामाजिक कार्यकर्ते शशीकांत साळवे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक किरंगे, प्रकाश काटेंगे आदी उपस्थित राहणार आहे.

संमेलनात करवाफा, भडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील 24 शासकीय तर  16 अनुदानित अशा एकूण 40 आश्रमशाळेतील खेळाडू  सहभाग घेणार आहेत .14 , 17 व 19 वर्ष वयोगटात कबड्डी, खो- खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले या सांघिक खेळासह लांबउडी,  उंचउडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे या वैयक्तिक खेळाचे आयोजन केलेले आहे.

पारितोषिक वितरण सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या हस्ते 11 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी चंदा मगर, निलय राठोड, प्रभू सादमवार, अनिल सोमनकर, सुधाकर गौरकर आदी उपस्थित राहणार आहेत.

क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत.यासाठी रांगीचे मुख्याध्यापक अजय आखाडे यांच्यासह सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांवर जबाबदारी आहे.






  Print






News - Gadchiroli




Related Photos