मुलचेरा येथील पोलीस उपनिरीक्षकांच्या पत्नीने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी :
उपविभाग अहेरी अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन मुलचेरा येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक धनराज शिरसाठ यांच्यासह त्यांची पत्नी संगीता (२८), भार्गर्वी (९), शुभम (४) अशी दोन मुले, पोलीस उपनिरीक्षकांचे आई-वडील असा परिवार एकत्रित वास्तव्यास होता. पोलीस उपनिरीक्षक धनराज शिरसाट हे नक्षलविरोधी अभियान राबवून आज, ७ मे २०२० रोजी पोमके मुलचेरा येथे परतले होते. त्यानंतर ते त्यांचे आई-वडिलांसह मुलचेरा येथे कामानिमित्त गेले होते. यावेळी त्यांची पत्नी संगीता व दोन मुले घरीच होते. दरम्यान १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान संगीता शिरसाट यांनी राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून घेतली. गोळी झाडल्याचा आवाज ऐकून मुलगी भार्गवीने आरडाआरोड केला. यावेळी पोमके येथे कर्तव्यावर असलेले कर्मचारी व अधिकारी हे घटनास्थळी गेले असता पोलीस उपनिरीक्षकाची पत्नी संगीता जखमी अवस्थेत पडली होती. यानंतर त्यांना लगेच उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. या घटनेवरून आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-07


Related Photos