महत्वाच्या बातम्या

 बालसंगोपन योजनेचे अर्थसाह्य वाढवा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / देसाईगंज : इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात बालसंगोपन योजनेंतर्गत अत्यल्प अर्थसाह्य दिले जाते. हे अर्थसाह्य वाढवावे, अशी मागणी महाराष्ट्र एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली. एकल महिलांनी आरोग्य प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ.सूर्यप्रकाश गभने, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विजय बन्सोड  यांच्या नेतृत्वात बालसंगोपन योजनेचे पैसे वाढविण्यासंदर्भात निवेदन दिले. याप्रसंगी अधिकाऱ्यांनी एकल महिलांसोबत संवाद साधला आणि बाल संगोपन योजनेचे १ हजार १०० रुपयावरून २ हजार ५०० रुपये वाढवण्यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्री यांना उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे यांच्यामार्फत निवेदन पाठविले. निवेदन नायब तहसीलदार विलास तुपट यांनी स्वीकारले. याप्रसंगी कार्यकर्त्या आरती पुराम, एकल महिला नलिनी घोरमोडे, वैशाली सायम, सुनीता डुंभे व कार्यकर्ते उपस्थित होते. बाल संगोपन योजनेचे अर्थसहाय्य वाढविण्याची गरज असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos