नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसची एकहाती सत्ता कायम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
स्थानिक जिल्हा परिषद पोटनिवडणूकीच्या १६ जागांचा निकाल लागला आहे. हाती आलेल्या निकालांनुसार, भाजप ३, राष्ट्रवादी २, काँग्रेस ९, शेकाप १, गोंडवाना गणतंत्र पार्टीचा एका जागेवर विजय झाला आहे. तर शिवसेना आणि इतर एकही जागा मिळालेली नाही. नागपूर जिल्हा परिषदेच्या १५ मतदारसंघासाठी तर पंचायत समितीच्या ३१ मतदारसंघासाठी काल (मंगळवारी) पोटनिवडणूक झाली. जिल्ह्यातील ग्रामीण भागांत विखुरलेल्या १ हजार ११५ मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून मतदारांनी आपला कौल दिला.
नागपुरात काँग्रेसच्या मागच्या तुलनेत दोन जागा वाढल्या आहेत. काँग्रेस ७ वरून ९ वर गेली आहे. भाजपनं एक जागा गमावली असून भाजप ४ वरून ३ वर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागा गमावल्या असून राष्ट्रवादी ४ वरून २ वर आली आहे, तर शेकापने आपली १ जागा कायम राखली आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टीने १ जागा जिंकत जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे. तर शिवसेना ११ मतदारसंघात निवडणूक लढवूनही एकही जागा जिंकू शकली नाही.   Print


News - Nagpur | Posted : 2021-10-06
Related Photos