नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेले तब्बल ७९५ जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नांदेड :
  एक खळबळजनक माहिती नांदेडमधून समोर येत आहे. एका धार्मिक कार्यक्रमासाठी पंजाबमधून आलेले शीख यात्रेकरू लॉकडाउनमुळे नांदेडमध्येच अडकून पडले होते. या यात्रेकरूंना आठ दहा दिवसांपूर्वी विशेष गाड्यांनी परत स्वगृही पाठवण्यात आलं. पण, नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्या यात्रेकरुंपैकी तब्बल ७९५ जण करोनाग्रस्त निघाले आहेत. त्यामुळे पंजाब सरकारची झोप उडाली असून, नांदेड प्रशासनही हादरले  आहे. कारण हे यात्रेकरू महिनाभर नांदेडमध्ये मुक्काम करून होते.
हल्ला महल्लासाठी पंजाबमधून काही भाविक नांदेडमध्ये आले होते. त्यानंतर लॉकडाउन लागू झाल्यानंतर ४० दिवसापासून हे भाविक मुक्कामाला होते. त्यांना परत नेण्यासाठी पंजाब सरकारकडून प्रयत्न सुरू होते. महाराष्ट्र सरकार आणि पंजाब सरकारमध्ये झालेल्या चर्चेनंतर केंद्रानं त्यास परवानगी दिली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ट्रॅव्हल्सनं तेरा गाड्यामधून १ हजार ७०० जणांना घरी सोडण्यात आले . त्यानंतर टप्याटप्याने इतरही यात्रेकरूंना पंजाब सरकार परत घेऊन गेले. पण, या यात्रेकरूंची घेऊन जाण्याआधीच करोना चाचणी न केल्याने आता ही धक्कादायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे.
पंजाब सरकारनं ८० ट्रॅव्हल्सच्या मदतीने  ४ हजार नागरिकांना परत राज्यात नेले. त्याठिकाणी या यात्रेकरूंची तपासणी करण्यात आली. त्यात तब्बल ७९५ जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. २८ एप्रिल रोजी पंजाबमधील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५१० पर्यंत होती. मात्र, अचानक आठशे रुग्ण वाढल्याने  पंजाबमधील रुग्णांची १ हजार २३२ वर पोहोचली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-05-06


Related Photos