सीमेलगतच्या परराज्यातून व परजिल्ह्यातून येणाऱ्या मजुरांमुळे कोरोनामुक्त गडचिरोलीसमोर नवे आव्हान उभे


- सतर्क राहून विशेष लक्ष देण्याची प्रशासनास गरज

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
ग्रीनझोन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला तर नवल वाटायला नको. कारण म्हणजे तेलंगणा सरकारने दोन दिवसात हजारो मजुरांना राज्यांच्या सीमेवर आणुन सोडले आहे. राज्याच्या सीमा लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला अधिकची चिंता भेडसावत आहे. माओवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या जंगलव्याप्त भागातून वाहणाऱ्या गोदावरी आणि प्राणहिता नदीतून रात्रीच्या वेळेस नद्या पार करून हजारो मजूर गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती आहे. या मजुरांमुळे करोनामुक्त गडचिरोलीसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. ग्रीन झोनमध्ये असलेला गडचिरोली जिल्हा आता संकटात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण शेजारील राज्यांनी तेथील जवळपास हजारो मजुरांना गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर आणून सोडण्यात आले आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांची काळजी वाढत आहे. विविध राज्यांतील सरकारने या मजुरांना कोरोनाची तपासणी केले आहे का? जर कोरोनाची तपासणी न करता सोडले असेल तर आता गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांची मोठी चिंता वाढणार आहे. तेलंगणा सरकारने गडचिरोली प्रशासनाला याबाबतीत माहिती दिली आहे का? जिल्ह्याच्या सीमेवर मजुरांचे जत्थेच्या जत्थे ट्रक भरून सोडण्यात येत आहेत. हे संपूर्ण मजुरांचे जत्थे आपआपल्या गावात पोहचत आहेत. गावातील शाळेत त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. यामध्ये एखादा कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यास जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यात कोरोना वाढणार तर नाही ना? ४० दिवसांच्या लॉकडाऊनवर पाणी फिरणार का? अशी शंका बळावली आहे. त्यामुळेच स्थानिक प्रशासनास सतर्क राहून विशेष लक्ष देण्याची गरज आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-05


Related Photos