लॉकडाऊनमुळे यूपीएससी पूर्व परीक्षा अखेर लांबणीवर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
प्रशासकीय सेवेत दाखल व्हायचे  स्वप्न बाळगून देशभरातले लक्षावधी विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देतात. IAS, IPS ऑफिसर होण्याची पहिली पायरी असलेली यूपीएससी पूर्व परीक्षा २०२० या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलली आहे. ३१ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली जाण्याची चर्चा होतीच. लोकसेवा आयोगाने आज सोमवारी जाहीरपणे ही परीक्षा पुढे ढकलली असल्याचे जाहीर केले.
यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अरविंद सक्सेना यांच्या उपस्थितीत परीक्षांच्या तारखेबद्दल आज सोमवारी बैठक झाली. त्या वेळी ३१ मे रोजी घेतली जाणारी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. कोविड १९  मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच पुढची तारीख ठरवण्यात येईल, असे  यूपीएससी तर्फे सांगण्यात आले.
देशव्यापी वॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढल्याने आणि अजूनही विषाणूचा फैलाव आटोक्यात न आल्याने परीक्षा घेण्यासारखं वातावरण नाही. आता २० मे नंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यानंतरच लेखी परीक्षेचे आयोजन केली जाईल. ही परीक्षा ऑनलाईन घेतली जाईल का याबाबतही चर्चा होती. पण यूपीएससी ने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. पूर्वपरीक्षेबाबतचा निर्णय २० मे नंतर घेण्यात येईल.




  Print






News - World | Posted : 2020-05-04






Related Photos