पवनी वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार : गावकऱ्यात वाघाची दहशत


- तालुक्यातील बारा दिवसात दुसरी घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / पवनी :
वनपरिक्षेत्र अंतर्गत सहवनक्षेत्र सावरला येथील नियत कक्ष गुडेगाव क्ष क्र ३११ येथे सकाळी ८ वाजताच्या दरम्यान मोहफूल संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघिणीने हल्ला करून ठार केल्याने परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.
जनाबाई वामन मोहदळकर (५८) असे वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या महिलेचे नावअसून ती खातखेडा येथील रहिवाशी आहे. आज शनिवार २ मे ला सकाळी ८  वाजताच्या  दरम्यान पवनी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सहवनक्षेत्र सावरला नियत कक्ष गुडेगाव  कक्ष क्र ३११  मध्ये घनदाट जंगलात मोहफुल वेचण्या करिता गेली असता झूडपात दबा धरून असलेल्या वाघिणीने महिलेवर हल्ला करून नरडीचा घोट घेत ठार केले. सदर महिला उशिरा पर्यंत घरी परत न आल्यामुळे मृतक महिलेचा मुलगा १०. ३० वाजताच्या  दरम्यान सोबतीला अन्य एकाला घेऊन जंगलात गेला असता जनाबाई ही मृत आढळून आली तर माणसाची चाहूल लागताच वाघिणीने पळ काढला.  
सदर घटना ही मुख्य रस्त्यापासून १  किमी अंतरावर घनदाट जंगलात महिला मोहफुल गोळा करतांना घडली असून वनविभागा मार्फत अविरत जंगलात वाघांचा वावर असून जनतेनी जंगलात जाणे टाळावे याकरीता जनजागृती सुरू आहे.  मात्र जंगलव्याप्त गावातील नागरिक याकडे दुर्लक्ष करून स्वतःवर आपत्ती ओढवून घेत असल्याचे चित्र पहावयास मिळते. सावरला सहवनक्षेत्रात यापूर्वी १९  मार्चला एका महिलेला वाघाने ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आज खातखेडा येथील महिलेला वाघाने ठार करून ८०  मीटर फरफटत नेवून तिचे उजव्या हाताचा व खांद्याचा मांस खाल्ल्याने गावकऱ्यात दहशतीचे वातावरण असून वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.   
सावरला सहवन क्षेत्रात घडलेल्या दुर्दैवी घटनेची वनविभागाने नोंद घेतली असून मृतकाचे अंत्यसंस्कार करण्याकरिता तातळीची मदत म्हणून पंचवीस हजाराची मदत केली असून घटनास्थळी भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होसिंग,  वनपरिक्षेत्र अधिकारी कु कोमल जाधव यांचेसह प. स.सभापती बंडू ढेंगरे, जि. प. सदस्या मनोरथा जांभूळकर , माजी जि. प सदस्य शंकरराव तेलमासरे, पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी भेट दिली.  
  Print


News - Bhandara | Posted : 2020-05-02


Related Photos