घरगुती गॅस सिलिंडर १६२. ५ रुपयांनी स्वस्त : सर्वसामान्यांना दिलासा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
देशात लॉकडाऊनदरम्यान मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. देशातील तेल विपणन कंपनीनं (HPCL, BPCL,IOC) विना अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. १४. २ किलो विना अनुदानित गॅस सिलिंडर १६२. ५  रुपयांनी स्वस्त झाला आहेत. दिल्लीत या नवीन सिलिंडरची किंमत ५८१. ५० रुपये आहे. त्याच वेळी १९ किलो वजनाचा सिलिंडर २५६ रुपयांनी स्वस्त झाला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आधीच लॉकडाऊनमध्ये इंधन आणि भाज्यांचे दर वाढत असताना सिलिंडर स्वस्त झाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.
IOC ने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये १४. २ किलोग्रॅम सिलिंडरचे दर ७४४ वरून ५८१ वर आले आहेत. कोलकातामध्ये हे दर ५८४.५०, मुंबईत ५७९.०० तर चैन्नईत ५६९.५० रुपये झाले आहेत.  Print


News - Rajy | Posted : 2020-05-01


Related Photos