विधानपरिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं : २१ मे रोजी होणार विधानपरिषद निवडणुका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्यासह देशभरात कोरोनाचं संकट असताना महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला होता. कारण कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला आता २८ मे रोजी ६ महिने पूर्ण होत आहेत. अशातच काही वेळापूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक घेण्यास परवानगी दिली. त्यानंतर आता ही निवडणूक २१ मे रोजी मुंबईत घेण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुका घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर योग्य प्रकारची खबरदारी घेवून ही निवडणूक घ्यावी, अशा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. आमदारकीवरून राजकीय पेच निर्माण झाला असतानाच निवडणूक आयोगाने ही परवानगी दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2020-05-01


Related Photos