गडचिरोली जिल्ह्यातील ११६ पोलिस अधिकारी व कर्मचारी पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित


- पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांचा समावेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
१ मे २०२० रोजी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक यांच्या कार्यालयाकडून पोलिस दलात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्हप्राप्त अधिकारी व कर्मचारी यांच्या नावांची यादी आज, ३० एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील गडचिरोली जिल्हा पोलिस दलाने या यादीत सर्वाधिक ११६ पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना पोलिस महासंचालकांचे पदक प्राप्त झाले आहे. गडचिरोली पोलिस दलाने कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पार पाडलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका वर्षभरात उप्पगुंटी निर्मलाकुमारी उर्फ नर्मदा हिच्यासारख्या २२ जहाल नक्षलवाद्यांना केलेली अटक, एके ४७ यासह आत्मसमर्पण करणारया जहाल नक्षली विलास कोल्हासह वर्षभरात ३५ नक्षलवाद्यांनी केलेले आत्मसमर्पण, वर्षभरात ९ नक्षलवाद्यांचा केलेला खात्मा आणि नक्षलविरोधी लढ्यात केलेल्या इतर उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरीमुळे या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या कामगिरीचे कौतूक पोलिस महासंचालक यांनी केले आहे. या यादीमध्ये पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासहीत ४ उपविभागीय पोलिस अधिकारी, ३ सहायक पोलिस निरीक्षक, २१ पोलिस उपनिरीक्षक, ७ सहायक फौजदार आणि ७८ कर्मचारी यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सर्व पदक प्राप्त पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-30


Related Photos