अमरावतीमध्ये आणखी सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह


- कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३५ वर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती :
शहरात कोरोना विषाणूने आता चांगलाच पाय फैलावायला  लागला आहे. सात व्यक्तींचा नमुना चाचणी अहवाल आज  गुरुवारी दुपारी १२ वाजता पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३५ वर पोहोचली. क्लस्टर हॉटस्पॉटच्या बाहेरही ७ बाधित निष्पन्न झाल्याने समूह संक्रमणाची भीती निर्माण झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज  गुरुवारी खोलापुरी गेट येथील २७ वर्षीय माहिला व ३९ वर्षीय पुरुष, हनुमान नगरातील ६५ वर्षीय महिला व ४५ वर्षीय पुरुष तसेच कंवर नगरातील ७८ वर्षीय महिला तसेच ४८ व ४५ वर्षांचा पुरूष, असे एकूण सात व्यक्तीचा नमुना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. या सर्व व्यक्ती सध्या येथील कोविड रुग्णालयात संस्थात्मक विलगीकरणात आहेत. त्यांना दुसऱ्या माळ्यावरील कोविड कक्षात दाखल केले आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-30


Related Photos