मुंबईत गेल्या २४ तासात कोरोनाचे ४७५ नवीन रुग्ण


- एकाच दिवसांत २६ जणांचा मृत्यू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : येथे गेल्या २४ तासांत ४७५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजार ४५७ झाला असून मृतांचा आकडा २७० वर पोहोचला आहे. पालिका रुग्णालये, खासगी प्रयोगशाळांमध्ये गेल्या एका दिवसांत केलेल्या ३७७ कोरोना चाचण्यांमधून ही आकडेवारी पालिकेने जाहीर केली आहे. आजच्या कोरोनाबाधितांच्या संख्येत २६ आणि २७ एप्रिल रोजीच्या १०० चाचण्यांचे अहवालही समाविष्ट असल्याचे पालिकेने म्हटले आहे. मृत्यू झालेल्या २६ जणांमध्ये २१ पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे. यामध्ये १६ जणांना दीर्घकालीन आजार होते असेही पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या एका दिवसांत १९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त होणार्यांची संख्या १ हजार ४२७ वर पोहोचली आहे.
News - Rajy | Posted : 2020-04-30