कोरोनावर औषध सापडल्याचा अमेरिकेने केला दावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन :
  कोरोनाच्या हाहाकाराने चिंतेत असलेल्या देशांना एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कोरोनावर औषध सापडले असल्याचा संशोधकांनी केला असून कोरोनाबाधितांवर ही लस परिणामकारक असल्याचाही दावा करण्यात आला आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांच्या या दाव्यानंतर कोरोनाविरोधात लढणाऱ्या देशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार डॉक्टर अँथोनी फॉउसी यांनी सांगितले की, रेमडेसिवीर औषधांच्या वापरानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होत असल्याचे समोर आले आहे. रेमडेसिवीर औषधांचा प्रयोग अमेरिका, युरोप आणि आशियातील ६८ ठिकाणांवरील १०६३ रुग्णांवर करण्यात आला होता. त्यानंतर हे औषध कोरोनाच्या आजारावर प्रभावी असल्याचे लक्षात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. या औषधांने रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याचा दर हा इतर औषधांपेक्षा चांगला असल्याचाही दावा करण्यात आला आहे.  Print


News - World | Posted : 2020-04-30


Related Photos