मुंबईमध्ये प्लाझ्मा थेरपी यशस्वी : आरोग्य मंत्री राजेश टोपे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नाशिक :
मुंबईत काल करण्यात आलेली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग पुण्यासह इतर ठिकाणीही राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. मुंबईत काल लिलावती रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी करण्यात आली असून ही थेरपी यशस्वी झाली आहे. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीचा दुसरा प्रयोग मुंबईच्याच नायर रुग्णालयात करण्यात येणार आहे. त्यानंतर पुण्यासह इतर ठिकाणीही केंद्राच्या गाइडलाइननुसारच ही थेरपी केली जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिली.
मुंबईतील कामाठीपुऱ्यात राहणाऱ्या एका तबलिगी जमातच्या सदस्याने काल लिलावती रुग्णालयात जाऊन त्याचा प्लाझ्मा दिला होता. त्यामुळे एका करोनाबाधितावर थेरपी करण्यात आली होती. ही थेरपी यशस्वी झाली आहे. दिल्लीच्या मरकजमध्ये गेलेल्या तबलिगीच्या या सदस्याला करोना झाला होता. करोनावर उपचार घेऊन बरे झालेल्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी तयार होते. ही अँटीबॉडी बाधित रुग्णाच्या शरीरात गेल्यास तो रुग्ण बरा होतो. एका व्यक्तीच्या प्लाझ्मामुळे तीन व्यक्तींवर उपचार करता येतो, असं सूत्रांनी सांगितलं.
  Print


News - Rajy | Posted : 2020-04-29


Related Photos