महिलांनी तोकडे कपडे घातल्याने कोरोनाचा प्रकोप ओढवला : तबलिगींच्या मौलानाचे वादग्रस्त वक्तव्य


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हा महिलांनी केलेल्या पापांची शिक्षा आहे, असं वादग्रस्त वक्तव्य पाकिस्तानच्या एका मौलानाने केलं आहे. तारिक जमील असे नाव असून तो पाकिस्तानमधील तबलिगी जमातचा मौलाना आहे.
पाकिस्तानमधील एका टेलिव्हिजन कार्यक्रमादरम्यान त्याने हे वक्तव्य केलं आहे. या १६ मिनिटांच्या संबोधनात त्याने पाकिस्तानच्या माध्यमांवर टीकाही केली. तो म्हणाला की, बायकांनी तोकडे कपडे घातल्याने निसर्गाकडून कोरोना महामारीचा प्रकोप ओढवला आहे. महिलांनी केलेल्या पापांची शिक्षा सगळ्या समाजाला भोगावी लागत आहे, असं वादग्रस्त वक्तव्य केले.
यानंतर तारिकवर पाकिस्तानतच चोहोबाजूंनी टीका होत आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेता आणि वॉशिंग्टन येथील पाकिस्तानचे माजी राजदूत शेरी रहमान यांनी तारिकच्या मुक्ताफळांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. मौलानांनी फक्त माध्यमकर्मींचीच नव्हे तर पाकिस्तानी महिलांचीही माफी मागावी. कारण पाकिस्तानमध्ये ५० टक्के जनता ही महिलांची आहे. त्यांच्यावर अशी गलिच्छ टीका करणं चूक आहे, असे म्हटलं आहे.  Print


News - World | Posted : 2020-04-28


Related Photos