भंडाऱ्यात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोनमुक्त असलेल्या भंडारा जिल्ह्यात आज कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणेने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हालचाली सुरू केल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यातील गराडा येथे नागपूरवरून गेलेली एक महिला करोना पॉझिटिव्ह आढळली आहे. या गावात मरकजमधून आलेले काही लोक होते. भंडाऱ्यातील हा पहिलाच कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही महिला कुणाकुणाच्या संपर्कात आली होती? याचा शोध घेण्यात येत आहे. या महिलेच्या कुटुंबाला क्वॉरंटाइन करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितले.  Print


News - Bhandara | Posted : 2020-04-27


Related Photos