वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
 कपिल वाधवान आणि धीरज वाधवान या दोघांनाही सीबीआयने ताब्यात घेतलं असून अटकेची प्रक्रिया सुरू झाली आहे. सीबीआयच्या लेखी विनंतीवरून वाधवान बंधूंना मुंबईत आणण्यासाठी सातारा पोलीस सहकार्य करत आहेत. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. 
कपील आणि धीरज वाधवान हे हाऊसिंग फायनान्स लि.चे (DHFL) प्रमोटर्स आणि येस बँक  घोटाळ्याचे आरोपी आहेत. राज्यात संचार बंदी सुरू असतानाच येस बॅक प्रकरणात जामीनावर असणारे वाधवान बंधू कुटुंबीयांसमवेत २३ लोकांना व्हीआयपी पास दिला गेला. मुंबईतून खंडाळा, महाबळेश्वर प्रवास यासाठी कार पास पत्र गृह विभाग सचिव विशेष अमिताभ गुप्ता यांनी दिला असा आरोप आहे. दरम्यान, वाधवान बंधूंना अंमलबजावणी संचनासय (ईडी) आणि सीबीआयने ताब्यात घ्यावे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याआधीच म्हटले होते.
'वाधवान बंधूंचा १४ दिवसांचा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचा कालावधी बुधवारी दुपारी २ वाजता समाप्त झाला. त्यांना ताब्यात घेतण्यात यावे, असे  सीबीआय आणि ईडीला सांगितले आहे. वाधवान बंधूंना सीबीआय किंवा ईडी ताब्यात घेत नाही तोपर्यंत ते राज्य सरकारच्या ताब्यात राहतील. कोणालाही लंडनला जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. सीबीआयने वाधवान बंधूंचा ताबा मागितल्यास त्यांच्या हवाले करण्यात येईल,' असं देशमुख यांनी स्पष्ट केले होते.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-26


Related Photos