कोरोना व्हायरसमुळे पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
कोरोना व्हायरसमुळे शनिवारी मुंबई पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर (वय ५७) यांचा मृत्यू झाला. ते वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती देण्यात आली.मुंबईत करोनामुळे पोलिसाचा झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. चंद्रकांत पेंदूरकर यांना २२ एप्रिल रोजी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून पेंदूरकर यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज संध्याकाळी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. पेंदूरकर हे वरळी येथे वास्तव्याला होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.   आतापर्यंत राज्यातील ९६ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यात १५ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि सरकारच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.  दरम्यान, आज राज्यात कोरोनाचे ८११ नवे रुग्ण मिळाले. आजवरचा २४ तासांतील करोना रुग्णसंख्येचा हा उच्चांक ठरला आहे. त्यामुळे आता ३ मे नंतरही राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-26


Related Photos