देशभरात आजपासून ही दुकाने सुरु राहणार : केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे देशभरात दुकानं, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारपासून देशभरातील दुकाने  उघडण्याची सशर्त परवानगी दिली होती. परंतु कोणती दुकाने  उघडी ठेवावीत, कोणती नाही याबाबत मात्र सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर आज शनिवारी सकाळी केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे .
गाव पातळीवर मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने  सुरू ठेवण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. परंतु कॅन्टोनमेंट झोन किंवा करोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी मात्र कोणतीही दुकाने सुरू ठेवण्याला परवानगी नसेल. तसेच शहरांमध्येही महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील सर्व स्टँडअलोन शॉप्स, रहिवासी परिसरातील दुकाने  आणि रेसिंडेन्सिअल कॉप्लेक्समधील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे  केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर बाजारपेठांमधील दुकाने  मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. तसेच शॉपिंग मार्केट, मार्केट कॉम्पलेक्स आणि शॉपिंग मॉल्स सुरू ठेवण्यासाठी मनाई असेल. गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शॉप्स अँड एस्टॅबलिशमेंट कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकांनांनाच सूट देण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त ई-कॉमर्स कंपन्यांनाही पूर्वीप्रमाणेच केवळ जीवनावश्यक वस्तूं पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मद्य विक्री करणाऱ्या दुकांनाना सुरू करण्याची परवानगी दिली नसल्याचेही स्पष्टीकरण सरकारने दिले आहे. दरम्यान, राज्यांनी किंवा केंद्रशासित प्रदेशांनी जाहीर केलेल्या कॅन्टोनमेंट झोन किंवा करोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी मात्र कोणतीही दुकाने सुरू ठेवण्याला परवानगी नसेल, असेही सरकारनं स्पष्ट केले आहे.
राज्य सरकार मात्र आपल्या अधिकारानुसार दुकाने  सुरू ठेवायची अथवा नाही यावर निर्णय घेऊ शकतात. तसेच सामान्य दुकानांना ५० टक्के कामगारांसह काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच काम करणाऱ्यांना मास्क घालने तसेच सोशल डिस्टन्सिंगचे  पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.



  Print






News - World | Posted : 2020-04-25






Related Photos