अमरावतीमध्ये कोरोनाचा चौथा बळी


-  शहरात कोरोनाचे एकूण १० रुग्ण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती :
जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. राज्याचा विचार केला असता सुरुवातीला अमरावतीत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र, आता कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अमरावती शहरात कोरोनाचे १० रुग्ण आहेत. दरम्यान,  जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. 
दरम्यान, राज्यात काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत  कोविड-१९ महाराष्ट्र अधिकृत माहितीनुसार ६ हजार ४२७ रुग्ण असून २८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर समाधानाची बाब म्हणजे ८४० रुग्ण ठणठणीत झाले आहेत. तर राज्यात ७७८ नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण ८९ हजार ५६१ निगेटिव्ह चाचण्या आल्या आहेत.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-24


Related Photos