उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद निवडीला आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्यपाल कोटय़ातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेवकाला मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलेच झापले. राज्यात सध्या वातावरण काय आहे, नको त्या याचिका दाखल करून कोर्टाचा वेळ वाया घालवू नका अशा शब्दांत न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांनी याचिकाकर्त्याची खरडपट्टी काढत त्याची मागणी फेटाळून लावली. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत अद्यापि राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नसताना अशा प्रकारची याचिका दाखल करणे हे अपरिपक्वतेचे लक्षण असल्याचेही त्याला सुनावले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी आमदार करावे, अशी शिफारस काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्यात आली आहे. याविरोधात पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपाचे माजी नगरसेवक रामकृष्ण पिल्ले यांनी आक्षेप घेत ऍड. अतुल दामले आणि ऍड. विजय किल्लेदार यांच्यामार्फत हायकोर्टात आज याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्यासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेण्यात आली.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-21


Related Photos