पंचायत समिती कोरची येथे तयार करण्यात आले सेल्फ सॅनिटाईस्ड रूम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
सध्या संपूर्ण भारतात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव बघितला जात असून महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण या विषाणूमुळे बाधित झाले आहेत. व या विषाणूला आळा घालण्याकरीता प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असुन सध्या महाराष्ट्रातील शेवटच्या टोकावर असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात कोरोना विषाणू चे रुग्ण आढळून आलेले नसून हा जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे.  हा जिल्हा ग्रीन झोनमध्येच राहावा म्हणून प्रशासनासोबत नागरिकसुद्धा खबरदारी घेत आहेत. महाराष्ट्रातील ग्रीनझोन मध्ये असलेल्या जिल्ह्यांना २० एप्रिल नंतर नियमांचे पालन करून काही व्यावसायीकांना शिथिलता  करण्यात आली आहे. तर या अनुषंगाने पंचायत समिती कोरची येथील गट विकास अधिकारी देवरे यांनी स्वतः हातभार लावून शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी पंचायत समिती कोरची येथे सेल्फ  सॅनिटाईस्ड रूम तयार केले. 
यासाठी सॅनिटाईस्ड लिक्विड मध्ये कुठलाही घातक रसायनाचे वापर करण्यात आलेले नसून त्यामध्ये डेटॉल लिक्विड चे वापर करण्यात आले असल्याचे देवरे यांनी सांगितले, जेणेकरून सॅनिटाईस्ड होणाऱ्या लोकांना या लिक्विड मुळे कुठलाही दुष्परिणाम होणार नाही. 
कोरची तालुक्यामध्ये २९ ग्रामपंचायत असून यापूर्वीच ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सोडियम हायपोक्लोराईड ची फवारणी करण्यात आली असल्याची माहिती विस्तार अधिकारी राजू फ़ाये यांनी दिली. तालुक्यामध्ये एमआरईजीएस चे कामे सुरक्षित अंतर ठेवून व प्रत्येक मजूराने मास्क लावून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 
काही कामे सुरू झाल्यामुळे आता पंचायत समिती कोरची येथे कार्यालयीन कामाकरिता येणार्‍या लोकांनी पहिले स्वतः पूर्ण सॅनिटाईस्ड होऊन आत मध्ये प्रवेश करावा म्हणून ही सेल्फ सॅनिटाईस्ड खोली तयार करण्यात आली असुन ही जिल्ह्यातील पहिलीच सेल्फ सॅनिटाईस्ड खोली असल्याची माहिती गटविकास अधिकारी देवरे यांनी दिली.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-21


Related Photos