चंद्रपूरात घराबाहेर पडतांना मास्क न लावल्यास २०० रुपये दंड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
जिल्हा कोरोनामुक्त जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. म्हणूनच या जिल्ह्याची ग्रीन झोनमध्ये गणना करण्यात आली आहे. आज २० एप्रिल पासून या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात शेती व उद्योग व्यवसायात शिथिलता दिली जाणार आहे. त्यानंतरचा काळ हा परीक्षेचा असू शकतो हे लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे निश्चित केले आहे. घराबाहेर पडताच मास्क न लावल्यास थेट २०० रुपये दंड आकारला जाणार आहे. महानगरपालिका -पोलीस -नगरपालिका- नगरपंचायती आदी सर्व अंमलबजावणी यंत्रणांना यासंबंधी स्पष्ट निर्देश दिले गेले आहेत. मास्क न लावल्यास २०० रुपये दंड व सोबतच जागेवरच २ मास्क दिले जाणार असून यामुळे कोरोनाचा प्रसार थांबवण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-04-20


Related Photos