महिला तलाठीला पुरुष तलाठयाने केली मारहाण, चिमूर तालुक्यातील पहिली घटना, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चिमूर :
चिमूर तालुक्यातील म्हसली साज्या येथे कार्यरत महिला पटवारी रंजना ढोले यांना पुरुष तलाठी बेंबरकर यांनी मारहाण केल्याची चिमूर तालुक्यात पहिली घटना घडली. याबाबत चिमूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पटवारी रंजना ढोले ह्या म्हसली या साज्याला ४ वर्षांपासून कार्यरत आहे. तसेच चिमूर तालुक्यात १० वर्षांपासून पहिली महिला तलाठी म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, १४ मार्च २०२० ला सिंदेवाही येथे विदर्भ पटवारी संघटना चिमूर तालुक्याची अध्यक्ष पदाकरिता निवडणूक होती. यात तलाठी ठोंबरे व तलाठी बेंबरकर या दोघांनी नामांकन दाखल केले. या मतदानाच्या दिवशी ठोंबरे यांना २९ मते मिळाली व बेंबरकर यांना २८ मते मिळाली. त्यात अध्यक्ष पदासाठी रंजना ढोले यांनी पटवारी संघटना माजी अध्यक्ष हनुमंत बेंबरकर यांना मतदान केले नव्हते. त्यानंतर १५ एप्रिल २०२० ला दुपारी १ वाजता मंडळ अधिकारी कार्यालय चिमूर येथे मंडळ अधिकारी तिडके यांनी मोबाईलद्वारे फोन केले असता रँडम कार्ड आणण्यासाठी तलाठी रंजना ढोले ह्या गेल्या असता बेंबरकर तलाठी कार्यालयात बसून होते व निवडणूकीची चर्चा व चार्ज घेण्यासाठीची तयारी सुरू होती. नंतर त्या ठिकाणी अचानक बेंबरकर चिडले व ९ महिन्याच्या गरोदर असलेल्या तलाठी रंजना ढोले यांचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता सलवार खिचून मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. याबद्दल चिमूर पोलीस स्टेशनला सायंकाळी ५  वाजता तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तक्रार ६ तास घेण्यात आली नाही व पोलिसांनी पोलीस स्टेशनला गरोदरपणात बसवून ठेवले. रात्री ११ वाजता तक्रार नोंदविली व दखलपात्र (FIR) या गुन्ह्याची नोंद न करता अदखल पात्र ( NCR) गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याकडे लक्ष देऊन बेजबाबदार तलाठ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तलाठी रंजना ढोले यांनी केली आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-04-18


Related Photos