जीवनावश्यक वस्तुंसाठी हिंगोली नगर परिषदेने विकसित केले ॲप


-  लॉकडाऊनच्या कालावधीत हिंगोली शहरातील नागरिकांना उपलब्ध होत आहेत ऑनलाईन जीवनावश्यक वस्तू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वसामान्य जनतेच्या आरोगयाच्या हितासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली असून, नागरिकांना घरीच राहाण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत गरजवंताना जीवनाश्यक वस्तुचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध माध्यमातून नियोजन केले आहे.
लॉकडाऊनमुळे हिंगोली नगरवासियांना आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. परंतु लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू जसे की, किराणा, भाजीपाला, फळे, दूध औषधी खरेदीची घरपोच सेवा देण्यासाठी नगर परिषद हिंगोलीद्वारे ‘दीनदयाळ उपाध्याय अंतोदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान’ अंतर्गत मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपद्वारे आता हिंगोलीकरांना सर्व सुविधा हाकेच्या अंतरावर उपलब्ध करुन देवून लॉकडाऊच्या कालावधीत दिलासा देण्याचे काम केले आहे.
सध्याच्या आधुनिक युगात शहरातील गरीब व पारंपरिक पध्दतीने व्यवसाय करणाऱ्या जसे की नळ दुरुस्ती, गॅस दुरुस्ती, लाईट फिटींग, सायकल तसेच मोटारसायकल मेकॅनिक, किराणा, भाजीपाला, फळ, औषधी दुकानदार आदी लोक आपला व्यवसाय व उपजीविका वाढविण्यासाठी महागड्या जाहिराती व विपणन कार्य (Marketing Activities) असे व्यवसाय वाढीस लागणाऱ्या युक्ती भांडवलाच्या कमतरतेमुळे करु शकत नाहीत. त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या दररोजच्या कामावर अवलंबुन असतो, त्यामुळे दैनंदिन काम भेटले तर त्यांची उपजीवीका सुरळीत चालते. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने अशाच शहरी भागातील गरीब व दारिद्य्र रेषेखालील नागरिकांचे राहणीमान उंचवण्याकरिता व त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याकरिता ‘दीनदयाळ उपाध्याय अंतउदय राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान’ राबवित आहे. या अभियानातंर्गत स्थानिकपातळीवर नगरपंचायत, नगरपरिषद तसेच महानगरपालिकाद्वारे सीएलसी सेंटर (CITY LIVEHOOD CENTER) म्हणजेच शहरी उपजिविका केंद्र स्थापन करीत आहेत. जेणे करुन असे व्यवसायिक व सदर अभियानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या सेवा व उत्पादीत झालेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यास मदत होत आहे. म्हणून डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने हिंगोली नगर परिषदेने ‘डिजिटल नगर परिषद उपक्रम’ हाती घेतला असून सर्व जिवनावश्यक गोष्टी या ॲपद्वारे मिळण्यास सुरुवात झाली आहे. आणि याचा फायदा हिंगोली नगरवासीयांना या लॉकडाऊच्या कालावधीत होत आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-18


Related Photos