महत्वाच्या बातम्या

 ग्रा.प. मेडपल्ली अंतर्गत गुर्जा (बु) येथे माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन वर्ग खोलीचे भूमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

तालुका प्रतिनिधी / अहेरी : जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत गुर्जा (बु) येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ ली ते ४ थी पर्यत शिक्षण असून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेत वर्गखोलीची कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती. माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे मागणी केली असता जि.प.अध्यक्ष यांनी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सदर वर्ग खोली मंजूर करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. सदर भूमिपूजन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मेळपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलादी होते.

यावेळी प्रमुख अतिथी पाटाळी पलो, रमेश पुपरेड्डीवार, मारोती देवतळे शिक्षक, विल्सन गावळे, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, टिंकू सलम, कार्तिक तोगम, संतोष येनगंट्टीवार, संतोष वसाके तसेच गावातील महीला पुरुष उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos