तलाठी आणि कोतवाल पोहोचविणार संस्थेमध्ये सात-बारा : ना. विजय वडेट्टीवार


- पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशासनाचा दिलासा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मूल :
पीक कर्ज घेण्यास पात्र असलेल्या शेतकऱ्यांना लाँकडाऊन मूळे सात-बारा मिळणे अडचणीचे झाले असुन हजारो शेतकरी पीक कर्ज घेण्यापासुन वंचित राहु शकतात. ही शक्यता लक्षात घेवुन महसुल प्रशासनाने पीक कर्ज घेण्यास पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे सात-बारा संबंधित सेवा सहकारी संस्थेकडे द्यावे. म्हणजे संस्थेला पाञ शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजुर करणे सोईचे होईल असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.
कोरोनाचा प्रार्दुभाव होवु नये म्हणुन जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुका स्तरावर करण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा आढावा जिल्ह्याचे पालकमंत्री 
ना. विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक प्रशासकीय भवनात नुकताच घेतला. आढावा दरम्यान उपस्थित झालेल्या प्रश्नावर विचार विनीमय करताना
सध्यास्थितीत शेतकरी संकटात आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नरत आहे. असे सांगताना ना. विजय
वडेट्टीवार यांनी पीक कर्ज घेण्यास पात्र  असलेल्या ज्या लाभार्थ्यांनी पीक कर्जाची रक्कम भरणा केलेली आहे, त्या शेतकऱ्यांना नवीन वित्त वर्षात पीक कर्ज घेण्यासाठी सात बाराची अडचण जात आहे. लाँक डाऊन मूळे तलाठी आणि कोतवाल यांची भेट दुर्मिळ झाली असुन आँन लाईन सेवेची केन्द्र सुध्दा बंद असल्याने नवीन सातबारा मिळवणे कठीण झाले आहे. यामूळे पीक कर्ज घेण्यास पात्र  असलेल्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणुन महसुल
प्रशासनाने साझाचे तलाठी आणि कोतवाल यांचे मार्फतीने लाभार्थी शेतकऱ्यांचा अद्यावत नोंदीचा सात बारा तयार करून संबंधित सेवा सहकारी
संस्थेकडे द्यावा. म्हणजे लाभार्थ्यांना पीक कर्जाचा लाभ घेता येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी डाँ. कुणाल खेमनार यांना दिल्याचे ना. वडेट्टीवार
यांनी सांगितले. जिल्हाधिकारी खेमणार यांनी या निर्देशाला अनुमोदन दिले असुन पुढील आठवड्यात कार्यवाहीचा शुभारंभ करण्याचे आश्वासन दिले आहे,
त्यामुळे जिल्ह्यातील पीक कर्ज घेण्यास पाञ असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पीक कर्ज घेण्यास पाञ असलेल्या लाभार्थ्यांनी शंका न बाळगता प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती ना. वडेट्टीवार यांनी केली. 
कोरोना संदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षण मोहीमेत इन्र्फेडेड थर्मोमिटर व्दारे तपासणी करण्याची विनंती करताना जि.प.चे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी जिल्ह्यातील सर्व तपासणी पथकांसाठी इन्फ्रेडेड थर्मोमिटर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. रावत यांची रास्त विनंती मान्य करतांना ना. विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा झाली असुन येत्या काही दिवसात त्याबाबतचे आदेश जिल्ह्यातील सर्व नगरा परीषद, नगर पंचायत आणि ग्राम पंचायत यांना प्राप्त होतील असे आश्वासन दिले.  यावेळी न.प.मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी मूल शहरासाठी इन्फ्रेडेड थर्मोमिटर खरेदी करणार असल्याचे सांगितले. यावेळी ना. वडेट्टीवार यांनी मूल तालुक्यातील गरजुंसाठी स्वतःच्या वतीने जीवनावश्यक साहीत्य उपलब्ध करून देत असुन प्रशासन आणि कार्यकर्त्यांनी याचे राजकारण न करता प्रत्येकी दोन-दोन अश्या चार व्यक्तीनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळुन साहीत्याचे वाटप करावे. असे निर्देश देताना ना. विजय वडेट्टीवार यांनी मूल शहरात लवकरच शिवभोजन थाळी केन्द्राचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे सांगितले, यावेळी ना. वडेट्टीवार यांचे हस्ते शहरातील पाच गरजुंना जीवनावश्यक साहीत्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसिलदार डि.जी.जाधव, संवर्ग विकास अधिकारी कपील कलोडे, मुख्याधिकारी विजय सरनाईक, ठाणेदार सतिशसिंह राजपुत या अधिकाऱ्यांशिवाय जि.प.चे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत, बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, उपसभापती संदीप कारमवार, संचालक संजय मारकवार, राकेश रत्नावार, शांताराम कामडे, नगर सेवक विनोद कामडे, ललिता फुलझेले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.  Print


News - Chandrapur | Posted : 2020-04-17


Related Photos