आरमोरीत वाघाच्या हल्ल्यात इसम ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कुड्याचे फुल तोडण्यासाठी शहरालगतच्या जंगल परिसरात गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज १६ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे.
ज्ञानेश्वर नीलकंठ कांबळे (४०) रा. आझाद चौक आरमोरी असे वाघाने ठार केलेल्या इसमाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार ज्ञानेश्वर कांबळे हा अन्य एकासह देसाईगंज मार्गावर भाजीसाठी  कुड्याचे फुल तोडण्यासाठी  गेला होता. यावेळी जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक ज्ञानेश्वर याच्यावर हल्ला केला. यामुळे तो जागीच गतप्राण झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.     Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-16


Related Photos