कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीने ४० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीने घाबरलेल्या एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. ही व्यक्ती मूळची नेपाळची राहणारी असून तिचं वय ४० वर्ष असल्याचं सांगण्यात आलं आहे. माटुंग्यातील एका खासगी कंपनीमध्ये 'पिऊन'चे काम करणाऱ्या या व्यक्तीने गळफास लावून जीवनाचा अंत केला. ही घटना मंगळवारी उघडकीस असून आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या भावाने पोलिसांना सांगितले की त्याच्या भावाला काही दिवसांपासून सर्दी,खोकल्याचा त्रास होत होता आणि तापही येत होता. 
आत्महत्या करणारी व्यक्ती ही टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीत कामाला होती. याच कंपनीच्या कार्यालयात त्याने आत्महत्या केल्याचं एका वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले ही व्यक्ती त्याच्या भावासलोबत राहात होती. मंगळवारी सकाळी भाऊ गाडी धुवायला बाहेर गेला होता. गाडी धुवून झाल्यानंतर जेव्हा तो परत आला तेव्हा त्याने भावाला हाक मारली. भावाने प्रतिसाद न दिल्याने त्याने दरवाजा ढकलला, तेव्हा त्याला भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसलं.
गेल्या २-३ दिवसांपासून आत्महत्या करणारी व्यक्ती सर्दी तापाने आजारी होती. त्याने डॉक्टरांकडे न जाता स्वत:च काही औषधं घेतली होती. तरीही त्याला गुण येत नव्हता. यामुळे त्याला भीती वाटायला लागली होती की त्याला कोरोनाची लागण झाली असावी. याच कारणामुळे तो नैराश्यात गेला होता आणि यातूनच त्याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी या व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयात नेण्यापूर्वी डॉक्टरांना कळवले. त्यांनी योग्य त्या उपाययोजना केल्यानंतर मृतदेह रुग्णालयात नेला. पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली मात्र त्यांना सुसाईड नोट सापडली नाही. या व्यक्तीने इतके टोकाचे पाऊल उचलण्याची काहीच कारण दिसत नव्हतं. मृताच्या नातेवाईकांनी सांगितले की त्याला कोरोनाची लागण झाल्याची सतत भीती वाटत होती. त्याने ही भीती त्याच्या नातेवाईकांपाशी बोलूनही दाखवल्याचं एका नातेवाईकाने सांगितलं आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-15


Related Photos