दिल्लीत पुन्हा २४ तासांमध्ये भूकंपाचा दुसरा धक्का


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : 
सर्व देशात कोरोनाचा कहर सुरू असताना राजधानी दिल्ली आज पुन्हा एकदा भूकंपाने हादरली. आज दुपारी पुन्हा धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता २. ७ एवढी होती. मात्र त्याची फारशी जाणीव झाली नाही. काल  रविवारी सायंकाळीही भूकंपाचे धक्के जाणवले होते. गेल्या २४ तासांमधला हा भूकंपाचा दुसरा धक्का आहे. दिल्ली आणि परिसरात हे धक्के जाणवले. काल रविवारच्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३. ५ एवढी होती. दिल्लीसह उत्तर भारतातल्या अनेक शहरांना हे धक्के जाणवले. मात्र कुठलीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही. सायंकाळी ५. ५० मिनिटांनी हे धक्के जाणवले. लॉकडाऊनमुळे सगळे लोक घरात होते. भूकंपाचे धक्के जाणवल्याने अनेक लोक घरांमधून बाहेर आले.
सर्व लोक सुरक्षीत असतील. घाबरण्याचं कारण नाही असं ट्वीट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं. तर कोरोना सुरू आहे. तो कमी म्हणून की काय आता भूकंप आला. देवा तुझ्या मनात आहे तरी काय असं ट्वीट उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केलं होतं.  Print


News - World | Posted : 2020-04-13


Related Photos