हँडवॉश, सॅनेटायझर बनवणाऱ्या कंपनीत स्फोट : दोन कामगारांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पालघर :
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील गॅलेक्सी सरफॅक्टटंट या हँडवॉश आणि सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीमध्ये आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट एम-३ मध्ये गॅलेक्सी सरफॅक्टटंट ही हँडवॉश आणि सॅनिटायझर बनवणारी कंपनी आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास इथे भीषण स्फोट झाला. सध्या लॉकडाउनमुळे कंपनीच्या बाजूच्या बहुतांश कंपन्या बंद असल्याने या स्फोटाचा आवाज सुमारे पाच किमीवर असलेल्या नांदगाव व मुरबे गावांपर्यंत ऐकू आला.
तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले असून गंभीर जखमी व संभाव्य मृतांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-13


Related Photos