गुगलने कोरोना विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर्सला डूडलच्या माध्यमातून केला सलाम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
गूगलने आपल्या विशेष डूडलसह रात्रंदिवस कोरोना विषाणूशी लढणार्‍या डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना अभिवादन केले आहे. गूगलने दुसऱ्यांदा डूडल बनविला आहे. यावेळी गुगलने कोरोनासमवेत रात्रंदिवस लढा देणाऱ्या डॉक्टरांसाठी डूडल तयार केले आहे. या विशेष गुगल डूडलमधील व्हिडिओद्वारे, सर्व डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांकडून कोरोनाशी सुरु असलेल्या युद्धात २४ तास लढत असल्यामुळेृ आभार मानले आहेत. तसेच लोकांनी घेतलेली खबरदारीही सांगण्यात आली आहे. जगभरात १८. ५  लाख लोकं कोरोनाव्हायरसमुळे प्रभावित झाले आहेत. कोरोनामुळे जगभरात मृतांचा आकडा १. १  लाखांवर गेला आहे.
या गुगल डूडलवर क्लिक केल्यावर, एक व्हिडिओ उघडेल (धन्यवाद डॉक्टर, परिचारिका आणि सर्व आरोग्य सेवा कर्मचारी). या व्हिडिओमध्ये वेगवेगळे डॉक्टर लोकांना सल्ला देताना दिसत आहेत. ते म्हणतात, "एक देश म्हणून एकत्र येण्याची, शांत राहण्याची ही वेळ आहे." आपल्या कुटुंबाचा आणि देशाचा बचाव फक्त आपल्या हातात आहे. या साथीच्या रोगात, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जिथे मदत आवश्यक त्या वस्तूंचा वापर करणे जसे की मास्क आणि सॅनिटायझर्स.'
गुगल डूडलच्या या व्हिडिओमध्ये डॉक्टर म्हणतात, 'आम्ही तुमच्यासाठी कामावर आहोत, तुम्ही आपल्या घरी राहा.' यापूर्वी गुगलने लोकांना आपल्या खास डुडल्सद्वारे कोरोना टाळण्याचे मार्ग सांगितले होते. ज्यामध्ये ४० सेकंद हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, चेहऱ्याला हाताने स्पर्श न करणे यासारख्या उपायांचा समावेश आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-13


Related Photos