नागपुरमध्ये एकाच दिवशी आढळले १४ करोनाबाधित


- चौघांचा 'मरकज कनेक्शन'

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
राज्यभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव विदर्भातही वाढू लागला आहे. एकाच दिवशी या उपराजधानीत १४ जणांचे चाचणी अहवाल करोनाकरिता पॉझिटिव्ह आले. त्यामुळे विदर्भातील धोका आणखी वाढला आहे. पहिल्यांदाच एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने करोनाबाधित सापडले असून, हा विदर्भातील रुग्णसंख्येचा आतापर्यंतचा उच्चांक आहे. आता एकट्या नागपुरात करोनाबाधितांची संख्या ४१ झाली आहे.
या चौदा रुग्णांपैकी काही जण नवी दिल्ली येथील 'मरकज'च्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, असं सांगितलं जात आहे. ती साखळी आता प्रशासन शोधून काढत आहे. करोनाच्या विषाणू चाचणीत सकारात्मक आलेले अन्य ८ जण या पैकी कोणाचे तरी निकट सहवासित आल्याने त्यांना लागण झाली. यातील एक जण नागपूरला लागून असलेल्या कामठी येथील रहिवासी आहेत. तर चार जण हे जबलपूर येथील रहिवासी आहेत. तीन जण काटोल मार्गावरील, तर उर्वरित काही जण सतरंजीपुरा येथील रहिवासी आहेत. या सर्व संशयितांना गेल्या काही दिवसांपासून आमदार निवासातल्या सक्तीच्या एकांतवास कक्षात ठेवण्यात आले होते. सकारात्मक आलेल्या १४ पैकी ४ जण जबलपूर येथील रहिवासी असून, ते जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, असा दावा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2020-04-12


Related Photos