कोरोनामुळे पुण्यात दोन महिलांचा मृत्यू : पुण्यातील एकूण मृतांची संख्या ३१ वर


-  नाशिकमध्ये १३ तर भिवंडीत पहिला रुग्ण सापडला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : 
पुण्यात कोरोनावर उपचार घेत असताना गेल्या पाच तासांत दोन महिलांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण मृतांची संख्या ३१ वर गेली आहे. या शिवाय आज नाशिकमध्ये १३, नागपूरमध्ये १४ आणि भिवंडीत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
पुण्यात सकाळपासून गेल्या पाच तासात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ५८ वर्षाच्या महिलेला ९ एप्रिलला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेला लठ्ठपणा स्लिप अपनिया आणि रक्तदाब असा आजार होता. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दुसरी ५६ वर्षीय महिला सोमवार पेठेत राहत होती. तिला ५ एप्रिलला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. तिला रक्तदाबाचा त्रास होता. सकाळी तिचे अवयव निकामी झाल्यामुळे तसेच करोनाची लागण झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे ससूनमधील मृतांची संख्या २२ झाली असून पुण्यातील एकूण मृतांची संख्या ३१वर पोहोचली आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये करोनाचे १३ नवे रुग्ण सापडले आहेत. हे सर्वजण आधीच्या करोना रुग्णांच्या संपर्कातील असून हे १३ रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात आले होते ? याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच या १३ही जणांच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच मालेगावमधील करोना रुग्णांची संख्या २७वर पोहोचली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-12


Related Photos