लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या टोळक्याला अडवले म्हणून पोलिसाचा कापला तलवारीने हात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पतियाळा :
लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या एका टोळक्याला पोलिसांनी अडवले म्हणून त्यातील एकाने पोलिसाचा हात तलवारीने कापल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील पतियाळा शहरात रविवारी सकाळी घडली आहे. हरजीत सिंह असे त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पतियाळा शहरातील भाजी बाजारात गाडीवरून फिरणाऱ्या एका टोळक्याला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र त्यांनी गाडी न थांबवता पोलीस बॅऱिकेट्सला नेऊन ठोकली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गाडीतील तलवारी, लोखंडी रॉड काढून पोलिसांवर हल्ला केला. .यात चार पोलीस जखमी झाले तर एका पोलीस अधिकाऱ्याचा हात कापला गेला. त्यानंतर ते टोळके तेथून पसार झाले.
पंजाबचे पोलीस महानिरिक्षक दिनकर गुप्ता यांनीा या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याची माहिती दिनकर गुप्ता यांनी दिली. पोलीस उपनिरिक्षक हरजीत सिंग यांचा तुटलेला हात शस्त्रक्रिया करुन पुन्हा जोडण्यात येणार आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-12


Related Photos