महत्वाच्या बातम्या

 कोरची येथील देवीच्या विसर्जनात शेकडो भाविकांची गर्दी


कोरची येथील देवीच्या विसर्जनात शेकडो भाविकांची गर्दी 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : दरवर्षी नवरात्र सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात असून यावर्षी झालेल्या नवरात्र उत्सवातील प्रत्येक कार्यक्रमात हजारो नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवून प्रत्येक कार्यक्रमाचे आनंद लुटले. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे कुठलेही कार्यक्रम घेण्यात आले नव्हते, परंतु यावर्षी नवरात्रीमध्ये रास-गरबा, रेकॉर्डिंग डान्स, प्रतियोगिता, मराठी नाटक, जस गीत, छत्तीसगडी नाच अशा विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये हजारोच्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शविली होती.

कोरची येथील दसरा हा संपूर्ण परिसरात प्रसिद्ध असून कोरची येथील दसरा बघण्याकरिता भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातून तसेच छत्तीसगड राज्यातील बहुसंख्य संख्येने नागरिक आले होते. यामध्ये उपस्थित जनसमुदायांना तीन तासाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. रावणाचा मुलगा अक्षय कुमार वध, मेघनाथ वध, कुंभकर्ण वध, लंका दहन व रावण वध असे प्रात्यक्षिक कोरची येथील कलाकारांनी प्रस्तुत केले. त्यानंतर एक तासाची आतिषबाजी करून रावण दहन करण्यात आले.

विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी१० वाजता सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ कोरची येथील दुर्गा मातेची पूजा- अर्चना करून व ज्योतिबा फुले चौक येथील शारदा मंडळ यांच्या शारदा मातेची पूजा अर्चना करून संपूर्ण शहरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये जस गीत पार्टी, दिंडी व डीजेच्या तालावर थिरकतांनी युवक वर्ग दिसून आले. संध्याकाळी ६ वाजता कोरची येथील तलावात मातेचे शांततापूर्वक विसर्जन करण्यात आले. उपस्थित जनसमुदायाने पाणावलेल्या डोळ्यांनी मातेला निरोप दिला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos