सोशल मीडियाद्वारे अफवा पसरविल्यास होणार कठोर कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  महाराष्ट्रासह देशभर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. अशा स्थितीत फेसबूक, व्हॉटसॲप, ट्वीटर, इन्स्टाग्राम, टिक टॉक इत्यादी सोशल मीडियाद्वारे अफवा पसरविल्या जात आहेत. यापुढे अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा गडचिरोली पोलिस दलाने दिला आहे.
सोशल मीडियावर कोणतीही खोटी बातमी किंवा अफवा पसरेल, अशी आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये, दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा कोणताही संदेश, फोटो, व्हीडिओ टाकू नये, अफवा पसरविणारा संदेश असल्यास तो कोणालाही फॉरवर्ड करु नये, जुने व्हीडिओ टाकून त्याखाली कोणताही मजकूर लिहून अफवा पसरवू नये असे आवाहन पोलिस दलाने केले असून, अशी कृती केल्यास संबंधितावर विविध कायद्यान्वये गुन्हे दाखल करुन त्यास अटक केली जाईल, असा इशारा पोलिस दलाने दिला आहे. शिवाय सध्या सायबर गुन्हेगार  हे उदभवलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन जनतेची आर्थिक फसवणूक करु शकतात. त्यामुळे नागरिकांनी कोणालाही बँकेच्या खात्यासंबंधी ओटीपी क्रमांक व इतर माहिती देऊ नये, कोरोनासंबंधी आर्थिक मदत क्यूआर कोडद्वारे होणार असल्याचे सांगण्यात येते, असे कॉल आल्यास सावध राहावे, असे आवाहन पोलिस दलाने केले आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-10


Related Photos