चंद्रपूर जिल्ह्यात संचारबंदी व लाॅकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या ९८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल


- ३५ आरोपींना अटक, २१५ वाहने जप्त, ४ लाख ४२ हजारांचा दंड वसूल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन व प्रशासनाने चंद्रपूर जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. तरीदेखील काही लोकांनी विनाकारण फिरुन संचारबंदी व लाॅकडाऊन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ अन्वये ९६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केला आहेे. शिवाय ३५ आरोपींना अटक केली असून २१५ वाहने जप्त करून ४ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूंमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला असून कोरोना विषाणूंचा प्रसार भारतात व संपूर्ण महाराष्ट्रात गतीने पसरत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी संचारबंदी व लाॅकडाउन आदेश निर्गमित केले असताना सुद्धा बरेच नागरिक सदर संचारबंदी व लाॅकडाऊन आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे १९ मार्च ते ९ एप्रिल या कालावधीत संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाद्वारे निर्गमित केलेल्या संचारबंदी व लाॅकडाऊनचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. तसेच पोलिसांना सहकार्य करावे. संचारबंदी व लाॅकडाऊनचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2020-04-09


Related Photos