दलित समाजाचा २५ वा बळी, भूमकाल संघटनेकडून नक्षलवाद्यांचा जाहीर निषेध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कोरची तालुक्यातील कोटगुल निवासी जिवता रामटेके या ४५ वर्षाच्या ग्रामस्थाची काल सकाळी नक्षलवाद्यांनी डोक्यात गोळी झाडून हत्या केली. कोणत्याही हत्या करताना नागरिकांना पोलिसाचे खबरी असल्याचे आरोप लावणे नक्षलवाद्यांची फॅशन झाली आहे. खरे तर मागील काही काळात या भागात पोलिस विभागाला नक्षलवादी भारी पडल्याचे दिसून येत आहे. कधी पुराडा सारख्या पोलिस स्टेशनवर भरदिवसा हल्ला होतो, तर कधी कोटगुल पोलिस स्टेशनसमोर बॉम्बस्फोटमध्ये पोलिस शिपाई मारला जातो. मागील एका वर्षात युगेंद्र मेश्राम या शिक्षकाची नाहक हत्या करून चुकीने केलेल्या हत्यासाठी माफी मागायचे नाटक केले गेले. मागच्याच आठवड्यात या भागात उपसरपंच याची हत्या केली गेली आणि आत्ता लगेच नाहक जीवता रामटेके या दलित समाजाच्या गरीब व्यक्तीला मारून नक्षलवाद्यांनी अमानवीय कृत्य केले आहे. गावकऱ्यांची चौकशी केल्यानंतर नक्षल आरोपाप्रमाने अशा प्रकारचे कोणत्याही कामात रामटेके असल्याचे नाकारले जात आहे. मागीलवर्षी मृतक रामटेके याला नक्षल धमकीचे पत्र आले. पत्र बारकाईने बघता कुणी तरी नक्षल्यांच्या नावाने स्वतःच पत्र टाकल्याचे दिसून येत आहे. कदाचित एका ग्रहस्थासोबत झालेल्या वादानंतर त्यानेच अशे पत्र नक्षलवाद्यांच्या नावाने काढले तर नाही, अशी शंका येते. कुटुंबाच्या म्हणण्याप्रमाणे या हत्येमागे त्याचा हात असल्याची शंका व्यक्त होत आहे आणि अशा काही नक्षल समर्थकांविरूद्ध कार्यवाहीची मागणी करीत आहोत. काही असले तरी रामटेके यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती. त्याची चौकशी केली असे दिसून येत नाही. भूमकाल संघटनेकडून याचे जाहीर निषेध केले आहे. सद्या कोरोना प्रादुर्भावामुळे या कुटुंबाला मोठ्या अडचणींना समोर जावे लागत आहे. नक्षलवाद्यांनी हत्या केल्यानंतर गावात स्वाभाविकच दहशतीचे वातावरण आहे. त्यात प्रशासनाकडून ज्या सुविधा मिळणे अपेक्षित ते काल आणि आज दुपारपर्यंत दिसून आले नाही. शवविच्छेदनाकरिता गडचिरोलीला यावे लागले. तिथे कोणत्याही सुविधा नसल्याने शिवाय वेळेवर कुणाचे आधार न मिळाल्याने रामटेके कुटुंबाला दवाखान्यातच उपासमार सहन करीत रात्र काढावी लागली. रामटेके कुटुंबाला स्थानिक स्तरावर नागरिकांनी सहकार्य करावे, असे भूमकाल संघटनेने आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सगळीकडे बंद असल्याकारणामुळे या कुटुंबाला मोठ्या अडचणींना समोर जावे लागत आहे. कोणतीही बाहेरील मदत पोहोचविणे अशक्य आहे. स्थानिक स्तरावर नक्षल समर्थक पुन्हा अडचणीत भर घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.  त्यामुळे स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे व अशे वरिष्ठांनी तातडीने आदेश काढण्यात यावे. नक्षलवादी या भागात त्यांची दहशत कायम ठेवून त्याचे अस्तित्व कायम करायचे प्रयत्न करीत आहेत. मात्र लोकांना मारुन त्याचे मन जिंकता येत नाही. नक्षलवाद्यांच्या हिंसा वृत्तीमुळे सामान्य लोकांच्या मनातून उतरले आहेत आणि हिंसेमुळे नक्षलवाद संपुष्टात येणार आहे हे नक्षलवाद्यांनी लक्षात घ्यावे. अशा सामान्य बांधवाला नाहक नक्षलवादी मारून त्यांची अमानवीय हत्या करतात. त्यांच्या हिंसेविरुद्ध निषेध नोंदवून भारत देशाच्या संविधानिक व्यवस्था सोबत आणि अशा पीडित लोकांच्या सोबत हे दाखवून द्यावे. नक्षल प्रभावित भागात नक्षलवादी त्यांचे शत्रू समझल्या जाणाऱ्या लोकांना तर मारतातच मात्र नक्षलवाद्यांचे सहकारी असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात मारेल आहे. लोकांनी अशा हिंसेविरूद्ध समोर गेले नाही तर उद्या पुन्हा आपल्यातील आपल्या कुटुंबातील लोकांना मारतील. हे लक्षात घ्यावे, असे भूमकाल संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरविंद सोहनी, सचिव डॉ. श्रीकांत भोवते, प्रा. प्रशांत विघे, प्रा. मिलिंद तुळसे, डॉ. सुशांत चीमनकर, अविनाश सोहनी, डॉ. मंगेश आचार्य यांनी म्हटले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-09


Related Photos