महत्वाच्या बातम्या

 सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास : डॉ. सौरव दत्ता


- सिनिअर मेडिकल ऑफिसर, डेप्युटी कमांडंट १९२ बटालियन CRPF गडचिरोली

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : सैनिकी विद्यालयातील शिस्तीचे डेप्युटी कमांडंट डॉ. सौरव दत्ता यांनी तोंडभरून कौतुक केले. बालपणापासून मिळालेल्या सैनिकी शिस्तीचे इथल्या विद्यार्थ्यांना पुढे नक्कीच फायदा होईल. जो विद्यार्थी बालपणातच शिस्तीत वाढतो तो विद्यार्थी कुठल्याही समस्येकरिता नेहमीच उत्तर बनून तयार राहतो, खेळात व शैक्षणिक क्षेत्रात इथल्या विद्यार्थ्यांनी केलेली कामगिरी उत्तम आहे. गडचिरोली जिल्हा हा देशपातळीवर मागास जिल्हा म्हणून जरी ओळखल्या जात असला, तरी या जिल्ह्यातील विद्यार्थी हा कोणत्याही क्षेत्रात आता मागे नाही, असे मत गडचिरोली जिल्ह्याचे डॉ. सौरव दत्ता सिनिअर मेडिकल ऑफिसर, डेप्युटी कमांडंट १९२ बटालियन CRPF गडचिरोली, यांनी गोंडवाना सैनिकी विद्यालयात दुसऱ्या दिवशी चाललेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उदघाटना प्रसंगी उद्घाटनीय भाषणामध्ये व्यक्त केला.

विद्यार्थ्यांचा सर्वागींण विकास विविध गोष्टीवर अवलंबून असतो. क्रीडा आणि कला हा त्यातला महत्वाचा भाग आहे एकंदरीत सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारा मंच आहे. त्यामुळे बौद्धिक तथा शारीरिक ऊर्जा मिळते, असे मार्गदर्शन पर भाष्य गडचिरोली जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी केले.

भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी, अंतर्गत असलेल्या गोंडवाना सैनिकी विद्यालयात सत्र २०२२ मध्ये १८ वे सैनिकोत्सव चे आयोजन करण्यात आले होते.

यातील दुसऱ्या दिवशीचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी उद्घाटक म्हणून गडचिरोली जिल्ह्याचे डॉ. सौरव दत्ता सिनिअर मेडिकल ऑफिसर, डेप्युटी कमांडंट १९२ बटालियन CRPF हे होते, तर गडचिरोली जिल्ह्याचे माध्य. शिक्षणाधिकारी राजकुमार निकम हे अध्यक्ष होते. कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्घाटक, अध्यक्ष व विशेष अतिथी यांच्या हस्ते कलेची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले. प्रसंगी मागील वर्षी गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचाही या वेळी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्तीपत्र, देऊन गौरव करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणेश वंदना नृत्याने केली, सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिनी ऑर्केस्ट्रा सादर केला यामध्ये देशभक्ती गीतासह विविध गीते सादर करण्यात आले. विशेष म्हणजे सर्वच वाद्य विद्यार्थ्यांनी हाताळले होते. या व्यतिरिक्त देशभक्ती, महाराष्ट्राची लावणी, शिवाजी महाराजांचे पोवाडा, आदिवासी नृत्य, पोट्टेहो कलेक्टर व्हा, गुजराती गरबा, कोळी नृत्य, शिवाय नृत्य, इत्यादी समूह नृत्य सादर करण्यात आले. या शिवाय मै जिना चाहती थी या नाट्याने प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळले तर यदा कदाचित या आधुनिक माहाभारतावर आधारित विनोदी नाटकाने एक उत्तम प्रकारचा सामाजिक संदेश प्रेक्षकांना दिला. 

सैनिकी विद्यालयातील प्रशासन, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करीत असतात आणि म्ह्णून दर वर्षी इथला विद्यार्थी हा गुणवत्ता यादीत झळकतोच, शिवाय क्रीडेचा मैदान असो वा सांस्कृतिक कार्यक्रमाचा मंच, झेंडा रोवणे हि कला इथल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. जेवढ्या प्रमाणात पुस्तकी ज्ञान महतवाचे आहे, तेवढेच सांस्कृतिक कला अंगी असणे आवश्यक आहे, असे बोलत सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांचे उदाहरण प्राचार्य संजीव गोसावी यांनी दिले. 

संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन रहीम पटेल व प्रा. डॉ. राकेश चडगुलवार यांनी केले व आभार गजानन अनमुलवार यांनी केले





  Print






News - Gadchiroli




Related Photos