खासगी लॅबमध्येही कोरोनाची तपासणी मोफत करावी : सर्वोच्च न्यायालय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. दरम्यान, कोरोनाची चाचणी महाग असल्याने ती मोफत करण्याची मागणी करण्यात येत होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत सुनावणी करतान सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाची चाचणी मोफत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच खासगी लॅबमध्येही कोरोनाची तपासणी मोफत करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला दिलेत.
यावेळी सर्वोच्च न्यायलयाने खासगी लॅबमध्ये देखील कोरोना विषाणूची तपासणी मोफतच करण्यात यावी असे म्हटले आहे. खासगी लॅबमध्ये तपासणीची प्रक्रिया काय असावी याबाबत निश्चित असे धोरणही ठरवावे, असेही सर्वोच्च न्यायालयना आपल्या आदेशात म्हटले आहे. कोरोना तपासणी आणि प्रसाराला पायबंद घालण्यासाठी प्रयत्नशील असणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
  Print


News - World | Posted : 2020-04-08


Related Photos