लिंगमपल्ली -किष्टापूर पुलाच्या कामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी केली जाळपोळ


- लाॅकडाऊनच्या काळातही काम सुरू असल्याने केला घातपात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी :
सध्या देशात व राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने गडचिरोली जिल्ह्यासह सर्वत्र लाॅकडाऊन करण्यात आले असताना काम सुरू ठेवल्याच्या रागात नक्षलवाद्यांनी अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथून जवळच असलेल्या लिंगमपल्ली -किष्टापूर पुलाच्या कामावरील २ ट्रॅक्टर व मिक्सर मशीनची जाळपोळ केली. सदर घटना ७ एप्रिल २०२० रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सदर कामाच्या कंत्राटदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या घटनेने कंत्राटदारासह त्या कामावरील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने लाॅकडाउन असल्याने संपूर्ण रहदारी बंद करण्यात आली होती. संपूर्ण प्रशासन लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत असून दिवसरात्र पोलिस प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. अशा परिस्थितीत दुर्गम व आणि अतिदुर्गम भागात काम बंद करण्याचे आवाहन कंत्राटदारांना करण्यात आले होते. तरीदेखील अतिदुर्गम भागात काम सुरूच ठेवल्याने नक्षलवाद्यांनी ही संधी साधून मंगळवारच्या मध्यरात्री त्या कामावरील २ ट्रॅक्टर, मिक्सर मशीन व सेेंट्रींगच्या सामानाची जाळपोळ केली. या घटनेमुळे परिसरात दशहत निर्माण झाली आहे. या घटनेमुळे कंत्राटदाराचे मोठे नुकसान झाले असून त्या कामावरील कामगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-08


Related Photos