लॉकडाऊन काळात नक्षल्यांनी केली रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / अहेरी :
तालुक्यातील जिमलगट्टा पासून नजीक असलेल्या लिंगमपल्ली-किष्टापूर पुलाच्या कामावरील वाहनांची काल रात्री च्या सुमारास नक्षल्यांनी जाळपोळ केली . कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने रहदारी बंद करण्यात आली आहे. संपूर्ण प्रशासन लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र जठत असून दिवस-रात्र पोलीस प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. दुर्गम आणि अतिदुर्गम भागात कंत्राटदारांना काम बंद करण्याचे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात  आले होते . मात्र अशाही परिस्थितीत दुर्गम भागात काम सुरू ठेवल्याने नक्षल्यांनी संधीचा फायदा घेत काल मध्यरात्रीच्या सुमारास  कमलापूर ते लींगमपल्ली रस्त्यावरील पुलाच्या  कामावरील २ ट्रॅक्टर आणि मिक्सर मशीनची  जाळपोळ केली आहे . या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे. नक्षल्यांनी  केलेल्या जाळपोळीमुळे कंत्राटदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-08


Related Photos