कोरोना संचारबंदीत दोन ठिकाणावरून १३ लक्ष ६० हजार रुपयांची दारू जप्त, ३ आरोपींना केली अटक


- भद्रावती व गडचांदूर पोलिसांची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
कोरोना विषाणूंच्या संचारबंदीत सुद्धा हातभट्टीवर दारू काढत असल्याच्या माहितीवरून भद्रावती व गडचांदूर पोलिसांनी ६ एप्रिल २०२० रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून १६ लक्ष ६० हजार २०० रुपयांची दारू जप्त केली. या कारवाईत तीन आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. भद्रावती येथील बरांज तांडा गावालगतच्या नाल्याजवळ काही इसम गुळ सडव्याचे ड्रम लावून हातभट्टीद्वारे दारू तयार करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिस स्टेशन भद्रावती येथील पोलिस पथकास मिळाली. या माहितीवरून ६ एप्रिल रोजी छापा टाकला असला जंगल झुडपात नाल्याजवळ ६ लाख रुपये किंमतीची १५ मोठे प्लाॅस्टिकचे ड्रम मिळून आले. सदर ड्रममध्ये २०० लीटर याप्रमाणे ३ हजार लीटर गुळ सडवा दारू, ५ हजार रुपये किंमतीची २ प्लाॅस्टिक कॅनमध्ये १० लीटर प्रमाणे गुळ सडवा दारू व इतर साहित्य असा एकूण ६ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोलिस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमांक १५८/२०२० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपींचा शोध व पुढील तपास भद्रावती पोलिस करीत आहेत.
तसेच दुसऱ्या घटनेत, दोन इसम कैलास नगर ते पैनगंगा कोसळा खदानमार्गे विरूनकडे एका चारचाकी वाहनाने अवेधरित्या दारूची तस्करी करणार आहे व त्या चारचाकी वाहनासमोर एका दुचाकी वाहनाने एक इसम पायलेटींग करणाार असल्याची गोपनीय माहिती पोलिस स्टेशन गडचांदूर येथील पोलिस पथकास मिळाली. यावरून ६ एप्रिल रोजी गडचांदूर पोलिसांनी पैनगंगा कोसळा खदानमार्गे विरूरकडे जाणाऱ्या पुलाजवळ नाकेबंदी लावून वाहनांची तपासणी करीत असताना एका दुचाकी व चारचाकी वाहनास ताब्यात घेवून विचारपूस केली असता, ह्युंडाई वाहन क्र. एमएच ३४ के ८६७७ मध्ये २ लाख १४ हजार २०० रुपये किंमतीची विदेशी दारू व ५ लाख रुपये किंमतीची चारचाकी वाहन असा एकूण ७ लाख ३४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हा पोलिस स्टेशन गडचांदूर येथे नोंद करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास गडचांदूर पोलिस करीत आहेत. सदर दोन्ही कारवाया चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात भद्रावतीचे पोलिस निरीक्षक पवार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा, पोलिस उपनिरीक्षक तुळजेवार, भद्रावती पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच गडचांदूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोपाल भारती यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार शकील अन्सारी, पोलिस नाईक अरविंद, पोलिस शिपाई धीरज, चालक कमलेश यांनी केली आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-04-07


Related Photos