पुण्यात कोरोनामुळे एकाच दिवशी तिघांचा बळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे :
शहरातील ससून रुग्णालयात आज आणखी तिघांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला. तिघांचे वय हे साठ वर्षांपेक्षा अधिक होते. त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. पुण्यातील मृतांची संख्या आता आठवर पोहोचली. या तिघांचा आज, मंगळवारी सकाळी ९ ते ११ दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळते.
पुण्यात आज तिघांचा मृत्यू झाला आहे. या तिघांनाही करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना इतर आजारही होते. आता पुण्यातील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
  Print


News - Rajy | Posted : 2020-04-07


Related Photos