कोरोना इफेक्ट : आता व्हॉट्सॲपवर एकावेळी एकाच व्यक्ती किंवा ग्रुपला फॉरवर्ड करता येणार मेसेज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर कोरोना व्हायरसच्या ज्या पद्धतीने चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहे. अशा फेक बातम्यांची व्हॉट्सॲपने गंभीर दखल घेतली आहे. करोना संदर्भातील बातम्या, व्हिडिओ, फोटोमधून अफवा पसरवल्याने व्हॉट्सॲपने मोठा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सॲपने एकाचवेळी पाच जणांना मेसेज फॉरवर्डींग करण्यात येत असलेल्या मेसेजवर मर्यादा आणली आहे. युजर्स आता केवळ एकाच व्यक्तीला मेसेज फॉरवर्ड करू शकणार आहे. याआधी एकाचवेळी पाच व्यक्तींना मेसेज पाठवता येवू शकत होता.
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू असताना व्हॉट्सॲपवर काही जण जाणीवपूर्वक मेसेजमधून फेक बातम्या व्हायरल करीत आहेत. या फेक बातम्या पसरू नये, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
याआधी फेसबुकने फेक न्यूज रोखण्यासाठी असाच धाडसी निर्णय घेतला होता. तर गुगलने खोट्या रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. तसेच मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरनेहे खोट्या बातम्या रोखण्यासाठी फिल्टर करणे सुरू केले आहे. व्हॉट्सॲपने घेतलेल्या या निर्णयाचे सगळीकडून कौतुक होत आहे. कंपनीचा हा निर्णय चांगला आहे. सध्या जगभरात करोनाची भीती पसरली आहे. सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हॉट्सॲपचा वापर होतो. दिवसभरात लाखो लोक लाखो मेसेज एक दुसऱ्यांना पाठवत असतात. त्यात काही लोक जाणीवपूर्वक एकाचवेळी फेक मेसेज फॉरवर्ड करीत असतात. त्यांना रोखण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. भारतात ४० कोटीहून अधिक लोक व्हॉट्सॲपचा वापर करतात.
  Print


News - World | Posted : 2020-04-07


Related Photos