करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा काही काळासाठी स्थगित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई
: राज्यातील करोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहीर केला आहे.
या संदर्भात आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नोवेल करोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने दिनांक २२ मार्च २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिनांक २६ एप्रिल २०२० व १० मे २०२० रोजी नियोजित अनुक्रमे राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब, संयुक्त पूर्व परीक्षा २०२० या दोन्ही सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत. दोन्ही  परीक्षा आयोजनासंदर्भात सुधारित दिनांक आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येतील.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-07


Related Photos